जगाच्या तुलनेत आपण उच्च शिक्षणाच्या विकासात खूप पाठीमागे आहोत. आपली विद्यापीठे सुधारण्यासाठी अजून किती वाट पहावी लागणार?

जगातील कुठल्याही विद्यापीठाचा दर्जा ठरवण्यासाठी काही महत्त्वाचे निकष ठरवले जातात. यामध्ये विद्यार्थी-प्राध्यापकांचे प्रमाण, अध्यापन पद्धती, संशोधन आणि संशोधन प्रबंध अशा बाबींचा समावेश आहे. आतापर्यंत प्रकाशित याद्यांचा विचार केला, तर आपल्या देशातील विद्यापीठांची गुणवत्ता फारशी समाधानकारक नाही. कारण जागतिक क्रमवारीत पहिल्या तीनशे विद्यापीठांच्या यादीत नेहमीच इनमिन तीन उच्च शैक्षणिक संस्था स्थान मिळवतात.......

गरिबांना सरसकट आरक्षण देऊन त्यांची फक्त आर्थिक परिस्थिती सुधारावी, असा घटनाकारांचा उद्देश नव्हता. मग सगळ्या समस्यांना आरक्षण हा पर्याय कसा असू शकतो?

प्रा. एरंडे यांनी जाणूनबुजून एक विधान केले आहे- ‘गरीब मराठा समाज सामाजिक-शैक्षणिक तसेच आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे’. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हा समाज आर्थिकदृष्ट्या मागास असेलही, परंतु मराठा सामाजिकदृष्ट्या कसा मागासलेला आहे, हे त्यांच्या संपूर्ण लेखातून समजत नाही. ज्याप्रमाणे गायकवाड आयोग मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे, हे सिद्ध करण्यात अपयशी ठरला आहे, तीच गत एरंडेसरांच्या लेखाचीही झाली आहे.......

मराठा समाजात मोठ्या प्रमाणात शिक्षणसम्राट, साखरसम्राट, सहकारसम्राट पाहायला मिळतात. तरीही हा समाज शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे?

आजच्या घडीला आरक्षण हे ऐहिक, भौतिक उत्थानाचा एकमेव मार्ग आहे, असे मानले जाते. त्यामुळे सामाजिक प्रस्थापित व सत्ताधारीसुद्धा आरक्षणाची मागणी करत आहेत. उच्च जातींना शिक्षणाची दरवाजे सताड उघडे असायचे. याला मराठा समाजही अपवाद नव्हता, तरीपण शिक्षणाची कास धरून उच्चाधिकारी होण्याऐवजी सरपंच ते मंत्री होण्यातच त्यांनी इतिकर्तव्यता मानली, असे ‘दलित पँथर’चे संस्थापक सदस्य ज. वि. पवार यांनी काही वर्षांपूर्वी लिहिले होते.......